आयटेल कंपनीने आपला Itel A60s Mobile लॉन्च केला आहे, जो 8GB रॅमच्या रेंजमधील सर्वात स्वस्त फोन सांगितला आहे. आपल्याला माहितच आहे की, आजच्या घडीला जास्त रॅम आणि बॅटरी बॅकअप पाहीजे असेल असेल मोबाईलच्या किंमती जास्त असतात, परंतू आयटेल कंपनीने आपला सर्वात स्वस्त लॉन्च करून इतर कंपन्यांना झटका देण्याचा प्रयत्न केला आहे.
सदरील Itel A60s Smartphone मध्ये 4GB Physical Ram व 4GB Virtual Ram म्हणजेच एकूण 8GB रॅम दिली आहे, मोबाईल मध्ये 6.6 इंच HD + IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. सदरील मोबाईल मध्ये 5000 mah ची बॅटरी देण्यात आली असून मोबाईलला OTG सपोर्ट सुध्दा आहे.
Itel A60s Mobile (Smartphone)
या मोबाईल मध्ये Face Unlock ची सुध्दा सुविधा देण्यात आली आहे. म्हणजेच तुमचा चेहरा पाहून मोबाईल अनलॉक होवू शकतो. शिवाय स्वत:चे सेल्फी काढतांना चेहरा चांगला कॅप्चर व्हावा यासाठी AI Beauty Mode सुध्दा देण्यात आला आहे. सदरील Itel कंपनी ही भारतातील प्रमुख कंपनी असून गेल्या अनेक वर्षांपासून मोबाईल निर्मिती करत आहे.