तुमच्‍या नावावर किती सिमकार्ड आहेत ? माहिती खालील प्रमाणे…

तुम्‍ही येथे सरकारच्‍या अधिकृत वेबसाईटच्‍या माध्‍यमातून हे पाहु शकता की तुमच्‍या नावावर किती सिमकार्ड आहेत आणि त्‍याचे नंबर काय आहेत. हे सर्व तुम्‍ही तुमच्‍या मोबाईलवर सुध्‍दा पाहु शकता. आणि जर तुम्‍ही तो नंबर वापरत नसाल तर तो बंद करण्‍यासाठी विनंतीही पाठवू शकता. यासाठी खालील प्रमाणे प्रोसस फॉलो करा.

  • सर्वप्रथम https://sancharsaathi.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.
  • त्‍यानंतर स्‍क्रीन थोडी वर करून खाली Citizen Centric Services असा पर्याय दिसेल. त्‍याखाली तुम्‍हाला Know Your Mobile Connection असा पर्याय दिसेल त्‍यावर क्लिक करा.
  • आता तुमच्‍या समोर एक स्‍क्रीन दिसेल त्‍यामध्‍ये तुमचा सध्‍या सुरू असलेला मोबाईल नंबर टाका.
  • त्‍यानंतर खाली दिलेला कॅप्‍चा जशास तसा भरा.
  • त्‍यानंतर Send OTP पर्याय दिसेल त्‍यावर क्लिक करा.
  • OTP मोबाईलवर आल्‍यानंतर तो सदरील बॉक्‍स मध्‍ये भरा.
  • आता तुमच्‍या समोर तुमच्‍या नावावर किती सिमकार्ड सुरू आहेत त्‍याची लिस्‍ट दिसेल.
  • जर सगळे नंबर बरोबर असतील तर काही अडचण नाही.
  • जर यापैकी एखादा नंबर तुम्‍ही वापरत नसाल किंवा सदरील नंबर तुम्‍ही घेतलेलाच नसेल तर त्‍याला बंद करण्‍याची विनंती तुम्‍ही पाठवू शकता.

अशा प्रकार तुम्‍ही तुमच्‍या नावावर किती सिमकार्ड आहेत आणि त्‍याचे नंबर काय आहेत ही माहिती सहज तुमच्‍या मोबाईलवर पाहु शकता. धन्‍यवाद…

सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…

बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नेहमी मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!