इलेक्ट्रिक ट्रॅक्‍टरची किंमत आणि इतर माहिती खालील प्रमाणे…

सदरील ट्रॅक्‍टर हे सोनालिका कंपनीने बनवले असून ज्‍याचे नाव Solalika Tiger Electric Tractor असे आहे. या ट्रॅक्‍टरच्‍या समोरील टायरची साईज ही 5-12 आहे तसेच मागील टायरची साईज 8-18 आहे. या ट्रॅक्‍टरची वजन उचलण्‍याची क्षमता 500 किलो आहे.

सामान्‍यत: या ट्रॅक्‍टरला चार्ज करण्‍यासाठी 8 ते 10 तास लागतात, मात्र जर फास्‍ट चार्जिंगवर चार्ज केल्‍यास अवघ्‍या 4 तासात फुल चार्ज होवू शकतो. एकदा चार्ज केल्‍यावर हा ट्रॅक्‍टर जवळपास 8 तास काम करू शकतो. कंपनी या ट्रॅक्‍टरवर 5 वर्ष किंवा 5 हजार तासांची वॉरंटी देत आहे.

ट्रॅक्‍टर मध्‍ये 6 फॉरवर्ड गिअर्स आहेत तर 2 रिव्‍हर्स गिअर्स आहेत. एकदा चार्ज केल्‍यावर हे ट्रॅक्‍टर 25 कि.मी. धावू शकते. या ट्रॅक्‍टर मधून कोणत्‍याही प्रकारची उष्‍णता निघत नाही, शिवाय बसायलाही आरामदायक आहे. डिझेल ट्रॅक्‍टरच्‍या तुलनेत याचा खर्च खूप कमी आहे. मिडीया मधील प्रकाशित रिपोर्ट नुसार या ट्रॅक्‍टरची किंमत 6 ते 6.50 लाख आहे.

सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…

बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नेहमी मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!