तुमचे खाजगी बोलणे कोणी ऐकू नये ही सेटींग कशी बंद करायची ? माहिती खालील प्रमाणे…

आपल्‍या मोबाईल मध्‍ये असलेले बहुतांश अॅप हे इन्‍सटॉल करतांना आपल्‍याकडून परवानगी मागत असतात आणि आपण कळत नकळत कोणत्‍याही प्रकारची शहानिशा न करता त्‍यास परवानगी देत असतो, अनेक अॅप तर मोबाईल घेतांनाच मोबाईल मध्‍ये असतात त्‍यातही बहुतांशवेळा परवानगी दिलेलीच असते.

अॅप मध्‍ये जर परवानगी दिलेली असेल तर आपले खाजगी बोलणे किंवा बँक आणि इतर महत्‍वाची माहिती ही लिक होण्‍याचा धोका असतो. त्‍यामुळे सदरील सेटींग बंद करणे आवश्‍यक असते. एखादे अॅप तुम्‍ही जर वापरत नसाल किंवा ते महत्‍वाचे नसेल तर सदरील अॅप मधील सेटींग कशी बंद करावी ते पाहुया…

  • सर्वप्रथम सेटींगला क्लिक करा.
  • त्‍यानंतर apps ला क्लिक करा.
  • सदरील अॅपला क्लिक करा.
  • Permission ला क्लिक करा.
  • यातील Microphone ला अनचेक करा. शिवाय नको असलेले इतर पर्याय सुध्‍दा अनचेक करू शकता. यामुळे सदरील अॅप तुमचे बोलणे रेकॉर्ड करू शकणार नाही.

दुसरी एक बाब म्‍हणजे आता जवळपास सर्वच प्रकारच्‍या मोबाईल मध्‍ये कॉल रेकॉर्डिंगची सुविधा येवू लागली आहे जर आपणास आवश्‍यकता नसेल तर Contact setting मध्‍ये जावून आपण रेकॉर्डिंगचा ऑप्‍शन बंद करू शकता.

सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…

बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नेहमी मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!