आपणास माहितच असेल की, सदरील प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविली जाते, या योजनेच्या माध्यमातून गरीब व वंचित नागरिकांना घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते, आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून लाखो कुटुंबांना लाभ देण्यात आलेला आहे.
घरकुल यादी कशी पहायची ?
तुमच्या गावातील घरकुल यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम या आर्टीकलच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर वेबसाईट उघडल्यावर सर्वात वर All States दिसेल त्यावर क्लिक करून आपले राज्य निवडा.
त्यानंतर जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.
आता येथे एक गोष्ट लक्षात घ्या, वरील पर्याय निवडल्यानंतर त्याखाली एक कॅप्चा दिलेला असतो, म्हणजेच बेरीज किंवा वजाबाकीचे आकडे दिसतात. उदाहरणार्थ 20 + 5 असे असेल तर समोर 25 लिहा. तसेच जर 12 – 6 असेल तर 6 लिहा. आकडे कोणतेही असू शकतात. फक्त बेरीज किंवा वजाबाकी करून आकडा टाकावा लागतो आणि Submit करावे लागते.
आता तुमच्या समोर तुमच्या गावातील सर्व लाभार्थ्यांची यादी दिसेल. त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव चेक करू शकता, शिवाय pdf सुध्दा डाउनलोड करू शकता, अर्थातच या वेबसाईटवर माहिती अपडेट होत असते. सदरील वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे. त्यावर क्लिक करून वरील प्रोसेस करा.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.