सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने शासनाने औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्रय रेषेवरील (एपीएल) केशरी शिधापत्रिका धारकांना लाभ देण्याचा निर्णय निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार सदरील 14 जिल्ह्यातील एपीएल शिधापत्रिका धारकांना फक्त 100 रूपयात 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखर व 1 लिटर खाद्यतेल अशा 4 शिधाजिन्नसांचा समावेश असलेला शिधाजिन्नस संच प्रथमत: गौरी गणपती उत्सवानिमित्त 1 संच आणि त्यानंतर दिवाळी सणानिमित्त प्रति शिधापत्रिका 1 शिधाजिन्नस संच या प्रमाणे प्रतिशिधापत्रिका 2 शिधाजिन्नस प्रति संच 100 रूपये प्रमाणे देण्यात येणार आहे.
सदरील संच गौरी गणपती उत्सवा निमित्त दि.1 सप्टेंबर 2023 पासून ते 30 सप्टेंबर 2023 या कालाधीत देण्यात येणार आहे. तसेच त्यानंतर दिवाळी सणा निमित्त दि.15 ऑक्टोबर 2023 पासून दिवाळी सणापर्यंत (दि.12 नोव्हेंबर 2023) वितरीत करण्यात येणार आहे. सदरील शिधा संचावर आनंदाचा शिधा असे नाव असणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील असंख्य नागरिकांना फक्त 100 रूपयात आनंदाचा शिधा मिळणार आहे.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.