ज्या टाटा नॅनो बद्दल खूप चर्चा होवू लागली आहे त्याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार सदरील कार ही इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये येणार आहे, दिसायला छोटी असली तरी या कार मध्ये बसण्यासाठी चांगली जागा राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या गाडी बद्दल सस्पेंस ठेवण्यात येत असला तरी विविध माध्यमातून चर्चा बाहेर येत आहे, या कार मध्ये पावर स्टेअरिंग, फ्रंड पावर विंडोज, लॉक सिस्टीम, ब्लूटूथ, साउंड सिस्टीम यासह अनेक सुविधा देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
कंपनीने आंतरीक डिझाईन मध्ये अनेक बदल केल्यामुळे ही कार नॅनो आहे की इतर कोणती गाडी असा प्रश्न पडतो. कंपनीने या गाडीबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा केलेली नाही, शिवाय या गाडीची किंमतही अजूनही जाहीर झालेली नाही, मात्र इतर कंपन्यांपेक्षा ही कार स्वस्त असेल अशी माध्यमांमध्ये चर्चा आहे. सदरील कार अधिकृतपणे लॉन्च झाल्यावरच सर्वच बाबतीत स्पष्टता येणार आहे.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.