तलाठी भरती निमित्त उमेदवार Talathi Bharti Hall Ticket and Exam Centre या बाबत माहिती घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्यात तलाठी भरती निमित्त विविध तारखांना परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या महसूल विभागा अंतर्गत तलाठी (गट क) संवर्गातील पदे भरण्यात येत आहे.
राज्य शासनाच्या महसूल विभागा अंतर्गत तलाठी पदाची भरती करण्यात येत असून 4 हजार 644 पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे, यासाठी तब्बल 10 लाख 41 हजार 713 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. सदरील परीक्षेचे आयोजन करण्यासाठी एका खाजगी कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.
Talathi Bharti Hall Ticket and Exam Centre
तलाठी भरतीसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विविध केंद्राच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात येत आहे, परीक्षेला 17 ऑगस्ट पासून सुरूवातही झाली आहे, परीक्षा केंद्रात अनेक गैरसोयीच्याही तक्रारी येत आहेत. राज्यभरात परीक्षा विविध तारखांना आयोजित करण्यात आली असून यामुळे उमेदवारां मध्ये काहीसे संभ्रमाचे वातावरण आहे.
Talathi Bharti Hall Ticket Download
सदरील तलाठी भरतीची परीक्षा ही TCS कंपनीच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान विविध तारखांना परीक्षा होणार असल्यामुळे आपला नंबर कधी आहे असा प्रश्न अनेक उमेदवारांना पडला आहे. हॉल तिकीट व परीक्षा केंद्राबाबतच्या माहितीसाठी… येथे क्लिक करा…