इलेक्ट्रिक किटची किंमत किती ? माहिती खालील प्रमाणे….

सदरील इ‍लेक्ट्रिक कन्‍व्‍हर्जन किट ही मुंबई स्थित Gogoa1 या कंपनीने तयार केली असून विविध वाहनांसाठी स्‍वतंत्रपणे तयार केली असून या इलेक्ट्रिक किटमुळे बाईक 60 ते 150 कि.मी. चालणार आहे. हिरो होंडाच्‍या अनेक मॉडेल्‍ससह अॅक्‍टीवा साठी सुध्‍दा किट तयार करण्‍यात आली आहे.

सदरील किटच्‍या माध्‍यमातून मोटारसायकल किंवा स्‍कूटीला इलेक्ट्रिक वाहनामध्‍ये कन्‍वर्ट करता येत असले तरी या किटची बॅटरी व इतर उपकरणांसह किंमत थोडी जास्‍तच आहे. साधारण 60 ते 70 हजार रूपये यासाठी खर्च येत आहे.

त्‍यामुळे एवढ्या जास्‍त किंमतीमुळे सर्वसामान्‍य वाहनधारक या इलेक्ट्रिक किटला किती प्रतिसाद देतात यावर बरंच काही अवलंबून आहे. कारण आधीच असलेल्‍या गाडीवर झालेला खर्च आणि त्‍यात पुन्‍हा 60 ते 70 हजार रूपये खर्च करणे सर्वसामान्‍य वाहनधारकांसाठी परवडेल का ? हा एक प्रश्‍न आहे. अर्थातच सध्‍या एका कंपनीने अशी किट सादर केली आहे मात्र येत्‍या काळात विविध कंपन्‍या स्‍वस्‍तात किट तयार करू शकतात यात शंका नाही.

सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…

बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नेहमी मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!