Your Alt Text

एकदा चार्ज केल्‍यावर 212 कि.मी. चालणार ही इलेक्ट्रिक स्‍कूटर ! इतर कंपन्‍यांना मोठा झटका ! | Simple One Electric Scooter

Simple One Electric Scooter : इलेक्ट्रिक वाहनांच्‍या कंपन्‍यांमध्‍ये एक प्रकारे प्रचंड स्‍पर्धा पहायला मिळत आहे, प्रत्‍येक कंपनी नवनवीन मॉडेल काढून ग्राहकांना आकर्षित करण्‍याचा प्रयत्‍न करीत आहे. आतापर्यंत कमी रेंज मधल्‍या इलेक्ट्रिक स्‍कूटर बाजारात उपलब्‍ध झाल्‍या होत्‍या, मात्र आता ज्‍या कंपनीने इलेक्ट्रिक स्‍कूटर लॉन्‍च केली आहे त्‍याने इतर कंपन्‍यांना डोक्‍याला हात लावायची वेळ आणली आहे.

कारण आता ज्‍या कंपनीने इलेक्ट्रिक स्‍कूटर लॉन्‍च केली आहे ती स्‍कूटर एकदा चार्जिंग केल्‍यावर तब्‍बल 212 कि.मी. चालते असा कंपनीने सांगितले आहे. गेल्‍या अनेक दिवसांपासून या इलेक्ट्रिक स्‍कूटरची लोकांना प्रतिक्षा होती, मात्र आता ही स्‍कूटर लॉन्‍च झाली आहे, विशेष म्‍हणजे स्‍कूटर लॉन्‍च होण्‍याआधीच जवळपास 1 लाख स्‍कूटर बुक झाल्‍याचे सांगितले जात होते.

Simple One Electric Scooter

सदरील स्‍कूटरचे नाव सिम्‍पल वन इलेक्ट्रिक स्‍कूटर असे असून ही स्‍कूटर आजच्‍या घडीला भारतात सर्वात जास्‍त कि.मी. रेज देणारी स्‍कूटर ठरली आहे. ही सकूटर 2.77 सेकंदात 0 – 40 किमी ताशी वेग पकडू शकते असेही कंपनीकडून सांगण्‍यात आले आहे. चार्जिंग करण्‍याच्‍या बाबतीतही इतर कंपन्‍यांपेक्षा या स्‍कूटरला कमी वेळ लागतो.

या इलेक्ट्रिक स्‍कूटरची किंमत किती ?

कंपनीच्‍या माहितीनुसार स्‍कूटर मध्‍ये दोन बॅटऱ्या असणार आहे, एक इनबिल्‍ट असेल तर दुसरी रिमूव्‍हेबल असेल म्‍हणजे काढता येणारी असेल. तसेच या स्‍कूटरमध्‍ये आग लागू नये यासाठी विशेष यंत्रणा बसवण्‍यात आली आहे. या स्‍क्‍ूटरला आपले स्‍मार्टफोन ब्‍लूटूथच्‍या माध्‍यमातून कनेक्‍ट करता येते. या स्‍कूटरची किंमत आणि इतर माहितीसाठी… येथे क्लिक करा…

Leave a Comment

error: Content is protected !!