फक्त आपल्याकडेच नाही तर जगात अनेक देश आहेत ज्यांच्याकडे वीजेची समस्या आहे, विशेष करून ग्रामीण भागात विजेची समस्या तर पहायला मिळतेच. विशेष करून देशात आणि जगात अनेक गाव, वाड्या वस्त्या आहेत जेथे अद्यापर्यंत वीज पोहोचलेलीच नाही, आता या समस्येवर कोलंबियन उर्जा कंपनी E-Dina ने नवीन संशोधन केले आहे.
E Dina या कंपनीने एक लँप (दिवा) बनवला असून या लँप मध्ये कपभर खारे पाणी किंवा समुद्राचे पाणी टाकल्यास रात्रभर लाईट चालते, म्हणजेच थोडे जास्त पाणी टाकल्यास अनेक दिवस लाईट चालू शकते, हा दिवा खाऱ्या पाण्याचे रूपांतर उर्जेमध्ये करतो.
या लॅम्प मध्ये अशी सुविधा आहे की, जेव्हा खारे किंवा समुद्राचे पाणी यंत्राच्या आत असलेल्या मॅग्नेशियम इलेक्ट्रोलाईट्सच्या संपर्कात येते तेव्हा ते प्रतिक्रिया देते आणि एक मिनी जनरेटर म्हणून कार्य करते, याचा वापर मोबाईल व इतर उपकरणे चार्ज करण्यासाठी देखील करता येतो. या नवीन संशोधनामुळे अनेक वंचित राहीलेल्या लोकांच्या घरात प्रकाश पडणार आहे.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.