महाराष्ट्र सरकारने असंघटित कामगारांसाठी (Unorganised Workers Scheme for Education ) विविध योजना सुरू केल्या आहेत. राज्यात बांधकाम व इतर बांधकाम कामगार हे असंगटित वर्गात येतात. राज्यात या कामगारांची संख्या खूप मोठी आहे. या कामगारांनाही चांगले जीवन जगता यावे, त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून शासनाने त्यांच्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत.
आज आपण येथे असंगटित कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शासनाने सुरू केलेल्या योजने बद्दल माहिती घेणार आहोत. बऱ्याचदा असंघटित कामगार आर्थिक अडचणीमुळे आपल्या मुला-मुलींना चांगले शिक्षण देवू शकत नाही, किंवा उच्च शिक्षण देण्यासाठी त्यांना आर्थिक अडचणी असतात.
Mahabocw for workers
असंघटित कामगारांच्या मुलांना पहिली पासून ते उच्च शिक्षणापर्यंत कोणतीही अडचण येूव नये, तसेच या कामगारांची मुले उच्च शिक्षण घेवून मोठी व्हावीत, त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी, त्यांना चांगले जीवन जगता यावे यासाठी शासनाने पूर्वीपेक्षा अधिक तरतूद केली आहे. शासनाने सुरू केलेल्या योजनांमुळे असंघटित कामगारांच्या मुलांना किंवा पत्नीला उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
Unorganised Workers Scheme for Education
महाराष्ट्र शासनाने असंघटित कामगारांच्या मुलांसाठी मग ते पहिलीत असो किंवा पदवी घेत असो किंवा वैद्यकीय शिक्षण घेत असो सर्वांसाठी मोठी तरतूद केली असून आता असंघटित कामगारांची मुलेही उच्च शिक्षण घेण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी शासनाने शिक्षणानुसार तरतूद केली आहे. कोणत्या वर्गासाठी किती पैसे मिळणार आहेत तसेच प्रत्येक वर्षासाठी किती पैसे मिळणार आहे याची महत्वपूर्ण माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा…