Jilha Parishad Bharti 2023 : राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांसाठी सुवर्णसंधी आली आहे. कारण ग्रामविकास विभागाअंतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये गट क संवर्गातील तब्बल 19460 पदांची मेगाभरती करण्यात येणार आहे. यामध्ये आरोग्य विभागातील 100 टक्के आणि इतर विभागातील 80% रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहे.
यापूर्वीच सदरील भरती होणार होती, म्हणजेच 2019 मध्ये सर्व जि.प. च्या गट क मधील विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत जाहीरात प्रसिध्द करण्यात आली होती, परंतू त्यावेळी लोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहिता , कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच इतर कारणांमुळे सदरील परीक्षा होवू शकली नव्हती, मात्र आता जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची पदभरती जाहीर करण्यात आली आहे.
Zilla Parishad Bharti 2023
सदरील भरती मध्ये आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे) इत्यादी पदे भरली जाणार आहेत.
Jilha Parishad Bharti 2023
सदरील जिल्हा परिषद भरती 2023 अंतर्गत विविध प्रवर्गात निवड झाल्यानंतर पगार 19,900 ते 1,12,400 राहणार आहे. ज्यांना सदरील पदभरती मध्ये परीक्षा दयायची आहे त्यांना परीक्षेचे शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 1000 रूपये राहणार असून राखीव वर्गासाठी 900 रूपये राहणार आहे.
अनेक दिवसांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जि.प. मध्ये भरती होणार असल्यामुळे राज्यातील तरूण तरूणींसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे. सदरील पदभरतीची शेवटची तारीख किती आणि अर्ज कुठे करायचा याबाबतच्या माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा…