आता तुम्हाला उत्सुकता लागली असेल की जर पेट्रोल, डिझेल आणि बॅटरीचीही आवश्यकता नसेल तर मग कार चालणार तरी कशी ? तर याचे उत्तरही आपणास येथे मिळेल.
पेट्रोल, डिझेल आणि बॅटरीशिवाय आता वाहन किंवा कार हायड्रोजनवर चालणार आहे. होय Hydrogen च्या माध्यमातून कार धावणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वीच एका कंपनीच्या Hydrogen Car मध्ये प्रवास करून त्याचे महत्व सांगितले आहे.
हायड्रोजनला आपण पेट्रोल, डिझेल किंवा बॅटरीला नवीन पर्याय समजू शकतो. कारण येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलवरील वाहने बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, म्हणजेच येत्या काळात आपल्याला हायड्रोजन सारख्या पर्यायी इंधनावर वाहने धावतांना दिसणार आहेत.
ज्या प्रमाणे आपण सध्या गाडी मधील पेट्रोल किंवा डिझेल संपल्यावर त्यास भरत असतो त्याच प्रमाणे आपल्याला हायड्रोजन कोठेही भरता येणार आहे, शिवाय हायड्रोजन हे स्वस्त असणार असल्यामुळे इंधनावर होणारा खर्चही कमी होणार आहे. त्यामुळे येत्या काळात आपल्याला मोठ्या प्रमाणावर हायड्रोजन वर चालणारी वाहने पहायला मिळणार आहेत.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.