Hydrogen Car in India : तंत्रज्ञान दिवसेंदिवस प्रगत होत चालले आहे. आजच्या युगात नवनवीन गोष्टी आपल्याला पहायला आणि ऐकायला मिळत आहेत. आतापर्यंत आपण पेट्रोल किंवा डिझेलवर गाड्या चालतात हे पाहत आलो आहोत, शिवाय इलेक्ट्रिक कारही मार्केट मध्ये आल्या आहेत, पण आता ज्या कार बद्दल आपण माहिती घेणार आहोत त्याला पेट्रोल, डिझेल किंवा बॅटरीची गरज नाही.
विश्वास बसत नसेल किंवा तुम्हाला आश्चर्य वाटत असेल पण हे खरे आहे. वर्षानुवर्षे पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर लक्षात घेवून या इंधनाला इतर पर्याय हवेत अशी सरकारची भुमिका आहे. त्यामुळेच मागील काळात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यात आले होते, सध्याही मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहन विक्री होत आहेत. मात्र आता यापुढेही जावून सरकारने नवनवीन पर्याय समोर आणण्यास सुरूवात केली आहे.
तुम्हाला कल्पना असेलच की, आपण पेट्रोल आणि डिझेल दुसऱ्या देशातून आयात करत असतो, ज्यामुळे आपले लाखो कोटी रूपये विदेशात जातात, जर आपण आपल्या देशातच पर्यायी व्यवस्था किंवा या इंधनाला पर्याय निर्माण करू शकलो तर आपला पैसा आपल्या देशातच राहील शिवाय पेट्रोल डिझेलसाठी जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत.
Hydrogen Car in India
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल सर्वांना माहितच आहे की, ते नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याबाबत आग्रही असतात, इतर देशांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता रहावे लागणार नाही या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, त्यांच्या आवाहनाला देशात जवळपास सर्वच कंपन्यांनी प्रतिसाद दिला असून आता पेट्रोल, डिझेल आणि बॅटरीशिवाय वाहन चालेल असे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. पेट्रोल, डिझेल आणि बॅटरी शिवाय कार कशी चालेल या माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा…