तलाठी पदासाठी परीक्षा कधी होणार ? माहिती खालील प्रमाणे…

तलाठी पदासाठी यंत्रणेकडून तयारी पूर्ण झाली असून प्रत्‍येक जिल्‍ह्यात परीक्षा केंद्र राहणार आहे. सदरील परीक्षा तीन सत्रात होणार आहे, म्‍हणजेच सकाळी 9 ते 11, दुपारी 12.30 ते 2.30 आणि सायंकाळी 4.30 ते 6.30 अशी वेळ राहणार आहे. उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेचे गाव / शहर समजणार असून मात्र परीक्षा केंद्र 3 दिवस आधी प्रवेशिके बरोबरच दिसणार आहे.

परीक्षा केंद्रावर कोणत्‍याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जाणार असल्‍याचे परीक्षा समन्‍वयक यांनी कळवले आहे. प्राप्‍त माहितीनुसार सदरील परीक्षा एकूण 200 गुणांची राहणार असून यामध्‍ये 45 टक्‍के गूण मिळवणे आवश्‍यक असल्‍याचे सांगण्‍यात येत आहे.

उमेदवारांची संख्‍या लक्षात घेता सदरील परीक्षा 3 टप्‍प्‍यात घेतली जाणार आहे. पहिला टप्‍पा 17 ते 22 ऑगस्‍ट असून दूसरा टप्‍पा 26 ऑगस्‍ट ते 1 सप्‍टेंबर राहणार आहे. तर तिसरा टप्‍पा 4 सप्‍टेंबर ते 14 सप्‍टेंबर राहणार असून या कालावधीत परीक्षा होणार आहे.

सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…

बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नेहमी मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!