शेतकऱ्याने मोटारसायकलचा कसा बनविला मिनी ट्रॅक्‍टर ? माहिती खालील प्रमाणे…

ज्‍या शेतकऱ्याने मोटारसायकलला मिनी ट्रॅक्‍टर बनवले आहे त्‍यांचे नाव पुंडलिक भवार असे असून ते अहमदनगर जिल्‍ह्यातील रहाता तालुक्‍यातील आहेत. सदरील शेतकऱ्याने तयार केलेला जुगाड हा एका राजदूत कंपनीच्‍या 125 सी.सी. इंजिन क्षमता असलेल्‍या मोटारसायकलच्‍या माध्‍यमातून केला आहे.

या मोटारसायकलला मिनी ट्रॅक्‍टर सारखे मॉडिफाईड करून या तीन चाकी मिनी ट्रॅक्‍टरला पाच फनी कोळपे बसवले आहे. जे शेतातील पिकांची आंतर मशागतीची कामे करण्‍यासाठी उपयोगी पडणार आहे. सदरील जुगाचा उपयोग मका, सोयाबीन, कापूर इत्‍यादी पिकांतील अंतर्गत मशागतीची कामे करण्‍यासाठी उपयुक्‍त ठरत आहे.

सदरील मिनी ट्रॅक्‍टर बनवण्‍यासाठी श्री.भवार यांना 40 ते 50 हजार रूपये खर्च आला असून आतापर्यंत त्‍यांनी आसपासच्‍या अनेक गावात जावून शेतकऱ्यांची शेकडो एकर जमिनीची कोळपणी व मशागतीची कामे केली आहे. सदरील बनवलेले मिनी ट्रॅक्‍टर वजनाने हलके असून यामुळे शेतातील पिके तुडवली जात नाहीत.

इतर शेतकऱ्यांना सदरील मशागतीची कामे करण्‍यासाठी खूप खर्च होत असतो, मात्र सदरील जुगाड करून बनविलेल्‍या तीन चाकी मिनी ट्रॅक्‍टरचा दर श्री.भवार यांनी एकरी एक हजार ठेवल्‍यामुळे इतर शेतकरी या जुगाड करून बनवलेल्‍या मिनी ट्रॅक्‍टरला पसंती देत आहे. यामुळे सदरील शेतकरी बांधवाची चांगली कमाई सुध्‍दा होत आहे.

श्री.भवार यांना सदरील कल्‍पना यूट्यूबवर जुगाड बनविण्‍याचे व्हिडीओ पाहून सुचली. आपणही काहीतरी जुगाड करावे या दृष्‍टीने त्‍यांनी त्‍यांच्‍याकडे असलेली 125 सी.सी. इंजिन क्षमतेची राजदूत कंपनीची मोटारसायकल वापरली आणि हा जुगाड केला. जो की राज्‍यभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…

बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नेहमी मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!