इंटरनेट शिवाय लाईव्‍ह टीव्‍ही, व्हिडीओ कसे पाहता येणार ? माहिती खालील प्रमाणे…

इंटरनेट शिवाय मोबाईल वर थेट लाईव्‍ह टीव्‍ही, व्हिडीओ, क्रिकेट, चित्रपट पाहण्‍यासाठी जे तंत्रज्ञान आले आहे त्‍याचे नाव D2M Technology आहे. म्‍हणजेच डायरेक्‍ट टू मोबाईल असे त्‍याला म्‍हटले जाते.

ज्‍या प्रमाणे आपण मोबाईलवर FM Radio ऐकतो, त्‍याच प्रमाणे हे तंत्रज्ञान असेल. ज्‍या प्रमाणे आपण एकाच फोनवर अनेक एफएम चॅनल ऐकू शकतो त्‍याच प्रमाणे D2M तंत्रज्ञानाद्वारे आपण फोनवर व्हिडीओ पाहू शकणार आहोत. सदरील तंत्रज्ञान हे ब्रॉडबँड आणि ब्रॉडकास्‍ट एकत्र करून तयार करण्‍यात आले आहे.

या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा म्‍हणजे की नागरिकांपर्यंत कोणत्‍याही प्रकारची माहिती थेट त्‍यांच्‍या मोबाईलवर प्रसारित करणे शक्‍य होणार आहे. ज्‍यामुळे फेक न्‍यूज रोखणे, आपत्‍कालीन अलर्ट जारी करणे, आपत्‍ती व्‍यवस्‍थापन, यासह विविध माहिती देशातील कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत पोहोचवणे शक्‍य होणार आहे.

सरकार एक तर ही सुविधा फ्री मध्‍ये देवू शकते किंवा अत्‍यंत कमी खर्चात ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकते. हे तंत्रज्ञान DTH आणि केबल सारख्‍या प्रसारणावर प्रभाव पाडू शकते, कारण D2M हे तंत्रज्ञान कोणत्‍याही मध्‍यस्‍थाशिवाय थेट घरांमध्‍ये किंवा मोबाईलवर होवू शकेल.

सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…

बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नेहमी मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!