भारतात D2M Technology क्रांती घडवणार आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण येत्या काही दिवसात तुम्हाला तुमच्या मोबाईलवर इंटरनेटशिवाय लाईव्ह टीवी, बातम्या, व्हिडीओ, क्रिकेट पाहता येणार आहे. काय आहे हे तंत्रज्ञान आणि याचा फायदा देशातील सर्वसामान्य नागरिकांना कसा होणार आहे याबाबत अधिक जाणून घेवू या.
आतापर्यंत आपणास माहितच आहे की आपल्याला टीव्हीवर चित्रपट, सिरीयल किंवा लाईव्ह टीव्ही, लाईव्ह न्यूज पहायची असल्यास डीटीएच लावावे लागत होते, शिवाय जर मोबाईलवर लाईव्ह टिव्ही किंवा व्हिडीओ पहायचे असेल तर त्यासाठी इंटरनेट आवश्यक होते, अर्थातच त्यासाठी महिन्याला बराच खर्च होत होता.
D2M Technology in India
आजही देशात अशी अनेक गावे किंवा ठिकाणे आहेत ज्या ठिकाणी इंटरनेट सुविधा पोहोचलेली नाही, शिवाय असंख्य गोरगरीब लोकांकडे टीव्ही किंवा डीटीएच कनेक्शन नाही, मात्र जर इंटरनेट किंवा डीटीएच शिवाय जर मोबाईलवर लाईव्ह टिव्ही, व्हिडीओ पाहता आले तर ? होय हे शक्य होणार आहे. हे कसे शक्य होणार आहे याबाबतच्या माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा…