महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली लेक लाडकी योजना ही मुलींसाठी अत्यंत महत्वाची ठरणार असून मुलींमध्ये आत्मविश्वास वाढवणारी आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलीच्या जन्मापासून ते मुलीचे शिक्षण आणि लग्नापर्यंत या पैशाचा लाभ होणार आहे. योजनेचा लाभ कसा मिळणार ते पाहुया..
या योजने अंतर्गत मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रूपये, शाळेत जायला लागल्यानंतर टप्प्या टप्पयाने 20 हजार रूपये व 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 75 हजार रूपये असे जवळपास 1 लाख रूपये मिळणार आहे.
लेक लाडकी योजने अंतर्गत केशरी किंवा पिवळे रेशनकार्ड असलेल्या कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर 5000 ची मदत दिली जाणार आहे, तसेच मुलगी पहिलीच्या वर्गात शाळेत गेल्यावर 4000 रूपये दिले जाणार आहेत, मुलगी 6 वी मध्ये गेल्यावर 6000 रूपये दिले जातील, तसेच मुलगी 11 वी मध्ये गेल्यावर 8000 रूपये दिले जाणार आहे.
तसेच मुलगी 18 वर्षांची झाल्यावर सरकारकडून मुलीला एकरकमी 75 हजार रूपये दिले जाणार आहेत. सदरील रक्कम मुलीच्या लग्नासाठी सुध्दा वापरली जावू शकते, असे जवळपास 1 लाख रूपये दिले जाणार आहे. सदरील योजने अंतर्गत लवकरच नोंदणी सुरू होणार आहे. नोंदणी सुरू झाल्यावर आम्ही आपणास कळवू, त्यासाठी आपण स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप ग्रुपच्या चिन्हाला क्लिक करून आमचा ग्रुप जॉईन करू शकता. सोबतच इतर योजनांची माहितीही आपणास मिळत राहील.