आकाशात उडणारी कार कशी असेल ? कोणत्‍या कंपनीने बनवली ? माहिती खालील प्रमाणे…

आकाशात उडणारी कार ह्युंडई या कंपनीने बनवली असून ही कार रस्‍त्‍यावर चालण्‍या सोबतच आकाशात सुध्‍दा उडणार आहे. विशेष म्‍हणजे या कारला पेट्रोलची आवश्‍यकता भासणार नाही, कारण कंपनी हायड्रोजन किंवा इतर सिंथेटीक पर्यायावर काम करत आहे. या कार मध्‍ये बॅटरी सोबतच इलेक्ट्रिक मोटार सुध्‍दा असणार आहे.

कारच्‍या वरचा भाग एखाद्या ड्रोन प्रमाणे असेल, सदरील ड्रोन मोबाईल चार्जिंग स्‍टेशन प्रमाणे काम करू शकेल. सदरील तंत्रज्ञान माल वाहतुकीच्‍या दृष्‍टीने आणि सुरक्षेच्‍या दृष्‍टीनेही महत्‍वाचे ठरणार आहे. कंपनीने अजून या कारच्‍या बऱ्याच गोष्‍टी गोपनीयतेच्‍या कारणाने जाहीर केलेल्‍या नाहीत, मात्र येत्‍या काळात सदरील कार लॉन्‍च झाल्‍यावर यातील अधिक सुविधा समोर येणार आहेत.

इतर कंपन्‍याही स्‍पर्धेत :-

फक्‍त Hyundai याच कंपनीने अशी कार बनवली नसून इतर अनेक कंपन्‍यांनीही आकाशात उडणाऱ्या कारवर मागील अनेक वर्षांपासून काम सुरू केलेले आहे, अनेकांनी तर ट्रायल सुध्‍दा दाखवली आहे. याचाच अर्थ येत्‍या काळात विविध कंपनीच्‍या Flying Car आपल्‍याला आकाशात उडताना दिसू शकतात.

सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…

बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नेहमी मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!