10 कोटींची लॉटरी कोणाला लागली ? पैसे कसे जमा केले ?

एक डायलॉग आपण अनेकदा ऐकला असेल, उपरवाला जब भी देता, देता छप्‍पर फाडके… असंच काहीसं घडलंय सफाई कामगार महिलांच्‍या बाबतीत. एक लॉटरीच्‍या तिकीटाने या गरीब महिलांचे नशीबच पालटलं आहे.

केरळ मधील मलप्‍पुरमच्‍या परम्‍पानंगडी नगर पालिके मध्‍ये काम करणाऱ्या 11 महिला सफाई कामगारांनी मिळून म्‍हणजेच सर्वांनी थोडे थोडे पैसे टाकून 250 रूपयांचे लॉटरीचे तिकीट घेतले होते. याच तिकीटवर या महिलांना तब्‍बल 10 कोटींची लॉटरी लागली आहे. जेव्‍हा या महिलांना लॉटरी लागल्‍याचे कळाले तेव्‍हा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

सर्व 11 महिला अत्‍यंत गरीब कुटुंबातील असून नगर पालिकेत सफाई कामगार म्‍हणून काम करत असतात. लॉटरी लागल्‍यामुळे या महिलांचे अनेक स्‍वप्‍न पूर्ण होणार आहे. मात्र तरीही त्‍यांनी आपण नगर पालिकेत कचरा उचलण्‍याचे किंवा सफाईचे काम करतच राहणार असल्‍याचे सांगितले.

लॉटरी लागल्‍यानंतर लोकांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली असून गरजू आणि योग्‍य व्‍यक्‍तीलाच लॉटरी लागल्‍याचे सांगितले आहे. यापैकी काही महिला अशा आहेत ज्‍या पैसे वाचवण्‍यासाठी घरापासून नगरपालिकेपर्यंत लांब प्रवास पायी करत असतात. लॉटरीच्‍या पैशाचा वापर या महिला घर बांधण्‍यासाठी आणि मुलांच्‍या शिक्षणासाठी आणि आधी घेतलेले कर्ज फेडण्‍यासाठी करणार असल्‍याचे सांगितले.

सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…

बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नेहमी मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!