सोलार रूफटॉप योजने अंतर्गत किती अनुदान मिळते ?

सदरील सोलार रूफटॉप योजना (Solar Rooftop Yojana) ही केंद्र सरकारच्‍या नवीन आणि नवीकरणीय उर्जा मंत्रालयाने सुरू केली असून या योजने च्‍या माध्‍यमातून आपण घराच्‍या छतावर 2 किलावॅटचे सोलर पॅनल लावू शकता. सदरील पॅनल 25 वर्षे टिकत असल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. त्‍यामुळे अनेक वर्षे वीज बिलाची चिंता राहणार नाही.

कंपनीनुसार किंमतीत थोडाफार बदल असू शकेल, परंतू प्राप्‍त माहितीनुसार 2 किलोवॅटचे सोलर पॅनल लावण्‍यासाठी सुमारे 1 लाख 20 हजार रूपये खर्च येतो, त्‍यातील 40 टक्‍के म्‍हणजेच 48000/- अनुदान मिळते, याचाच अर्थ आपल्‍या 72 हजारच्‍या आसपास खर्च येतो.

सदरील सोलर पॅनल 3 किलावॅटपर्यंत 40 टक्‍के सबसीडी असून 10 किलोवॅटपर्यंत 20 टक्‍के सबसीडी आहे. अधिक माहितीसाठी https://solarrooftop.gov.in/ या वेबसाईटला किंवा जवळच्‍या महावितरणच्‍या कार्यालयाशी संपर्क साधावा.

सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…

बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नेहमी मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!