Your Alt Text

25 वर्षे मोफत वीज ! घराच्‍या छतावर सोलर पॅनल लावा आणि मोफत वीज मिळवा ! सरकार देणार अनुदान ! | Solar Rooftop Subsidy Yojana

सरकारने नागरिकांना दिलासा देण्‍याच्‍या दृष्‍टीने Solar Rooftop Subsidy Yojana सुरू केली आहे. या योजनेच्‍या माध्‍यमातून तुम्‍ही छतावर सोलर पॅनल लावून वीज बिलाची बचत करू शकता. केंद्र सरकार असो की राज्‍य सरकार असो, सौर उर्जेला मोठ्या प्रमाणात प्रोत्‍साहन देण्‍यात येत आहे.

शेतीसाठी सुध्‍दा कुसूम सोलर पंप योजना सुरू करण्‍यात आली आहे जेणेकरून शेतकऱ्यांना दिवसा सुध्‍दा वीज पुरवठा मिळू शकेल. त्‍यासाठी सरकार तर्फे अनुदान देण्‍यात येते. आतापर्यंत शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नसल्‍यामुळे पिकांना रात्री पाणी द्यावे लागत होते, मात्र सोलर पंप योजनेमुळे हा त्रास कमी होणार आहे.

Solar Rooftop Subsidy Yojana

आता सरकारने घरगुती वापरासाठी सुध्‍दा सोलर रूफटॉप योजना सुरू केली असून एकदा हे सोलर पॅनल लावल्‍यानंतर अनेक वर्षे वीज बिलाची बचत किंवा वीज बिलातून मुक्‍तता होणार आहे. विशेष म्‍हणजे आपल्‍याकडे जास्‍त प्रमाणत वीज तयार होत असल्‍यास ती वीज आपण विद्युत कंपनीला सुध्‍दा विकू शकतो.

आपल्‍या देशात सूर्यप्रकाश दिवसात अनेक तास उपलब्‍ध असतो, आपल्‍या उष्‍णकटीबंधीय वातावरण असल्‍यामुळे सूर्यप्रकाशाची तिव्रता जास्‍त असते, त्‍यामुळे सौर उर्जा निर्मिती करणे हा एक चांगला पर्याय आहे. सौर उर्जेचे महत्‍व लक्षात घेवून जगात सुध्‍दा सौर उर्जेला प्रोत्‍साहन दिले जात असून आपल्‍याकडेही केंद्र आणि राज्‍य सरकारनेही सौर उर्जेला प्रोत्‍साहन देण्‍यासाठी अनुदान देणे सुरू केले आहे.

सोलार रूफटॉप योजने अंतर्गत किती अनुदान मिळते ? येथे क्लिक करा…

Leave a Comment

error: Content is protected !!