व्हाटसअॅप ने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. या सुविधेनुसार ग्रुप मधील कोणत्याही सदस्याला त्यांचे मित्र किंवा त्यांच्या मोबाईल मध्ये सेव्ह असलेले कोणतेही सदस्य अॅड करता येणार आहे. एकापेक्षा जास्त सदस्य सुध्दा अॅड करता येणार आहे.
यासाठी ग्रुप मधील सदस्याला सर्वात आधी ग्रुपला उघडावे लागेल, त्यानंतर वर दिसत असलेल्या ग्रुपच्या नावावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर स्क्रीन थोडी खाली घेतल्यावर खाली Add participants असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून आपल्या मित्रांना ग्रुप मध्ये अॅड करता येणार आहे.
याआधी ग्रुप मध्ये फक्त अॅडमीनच नवीन सदस्य करू शकत होते, तसेच दुसरा पर्याय म्हणजे ग्रुपची लिंक जेव्हा अॅडमीन तयार करून देईल तेव्हा ती शेअर करून अॅड होता येत होते, मात्र आता तसे नाही कोणतेही सदस्य सहज त्यांच्या मित्राला अॅड करू शकतात. यासाठी फक्त अॅडमीनने सेटींग मग मध्ये जावून Group Setting ला क्लिक करावे आणि फक्त Add Other Participants या पर्यायाला ऑन करावे. त्यानंतर सदस्य इतरांना अॅड करू शकतील.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.