2000 चा हप्‍ता मिळाला नसेल तर काय करावे लागेल ? माहिती खालील प्रमाणे….

पीएम किसानचा हप्‍ता 2000 चा हप्‍ता तुम्‍हाला का मिळाला नाही यासाठी तुम्‍हाला प्रथम तुमचे पीएम किसानचे स्‍टेटस काढावे लागेल, हे स्‍टेटस मोबाईल वरून सुध्‍दा काढता येते, परंतू त्‍याची प्रोसेस थोडी लांब असल्‍यामुळे तुम्‍ही जवळच्‍या CSC किंवा ई-सेवा केंद्रावरून तुमचे स्‍टेटसची प्रिंट काढून घ्‍या. स्‍टेटस काढतांना दुकानदाराला 14 व्‍या हप्‍त्‍याचे स्‍टेटस काढण्‍यास सांगा.

स्‍टेटस ची प्रिंट काढल्‍यानंतर तुम्‍हाला त्‍यात 3 गोष्‍टी प्रामुख्‍याने चेक कराव्‍या लागतील. पहिले म्‍हणजे तुमची E-kyc झालेली आहे का ? दूसरी गोष्‍टी Land Seeding म्‍हणजेच जमिनीची नोंद झालेली आहे का ? आणि तिसरी गोष्‍ट म्‍हणजे तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे का ? जर यापैकी कोणत्‍याही गोष्‍टी समोर x असेल किंवा झालेली दाखवत नसेल तर त्‍याची पूर्तता करावी लागेल.

E-kyc मोबाईलवरूनही करता येते मात्र त्‍यासाठी तुमचे मोबाईल आधारशी लिंक असणे आवश्‍यक आहे. किंवा तुम्‍ही CSC किंवा ई सेवा केंद्रावर जावूनही ekyc करू शकता. दूसरी बाब Land Seeding करणे शक्‍यतो सर्वांचे ok असते नसेल तर ते तहसिल कार्यालय किंवा कृषि विभागात जावून करावे लागते. तिसरा म्‍हणजे आपले बँक खाते आधारशी लिंक नसेल तर बँकेत जावून बँक खाते आधारशी लिंक करण्‍याची विनंती करावी, किंवा तुम्‍ही पोस्‍टात जावून नवीन खाते उघडून त्‍या खात्‍याला आधार लिंक करण्‍याची विनंती करू शकता.

वरील तिन्‍ही गोष्‍टी ok झाल्‍यास आपणास 14 वा हप्‍ता मिळण्‍यास हडचण राहणार नाही, म्‍हणजेच पुढच्‍या हप्‍त्‍या च्‍या वेळेस हा हप्‍ता शिवाय मागील हप्‍ते थकलेले असतील तरीही ते सर्व हप्‍ते एकाच वेळी आपणास भेटू शकतील… धन्‍यवाद….

सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…

बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नेहमी मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!