तुम्‍ही बऱ्याच दिवसांपासून 7/12 काढला नसेल तर ! वाचा खालील प्रमाणे…

आपल्‍याला माहितच आहे की, जमिनीच्‍या 7/12 वर आपली जमिन किती आहे ? गट नंबर कोणता आहे ? या गटावर विहीर किंवा बोअरवेलची नोंद झालेली आहे किंवा नाही ? विहीर कोणामध्‍ये सामाईक आहे ? आपल्‍या जमिनीवर बँकेचा किती कर्ज बोजा आहे ? अशा अनेक गोष्‍टी माहित होत असतात.

अनेक शेतकरी बांधव वेळोवेळी आपली आजच्‍या तारखेची 7/12 काढून या मध्‍ये काही बदल झाला का ते पाहत असतात, मात्र अनेक शेतकरी बांधव अनेक महिने किंवा वर्षभर 7/12 काढतच नाहीत, त्‍यामुळे 7/12 मध्‍ये होणारे बदल त्‍यांना माहितच होत नाहीत. मात्र यामुळे खूप अडचण होवू शकते किंवा नुकसान होवू शकते.

उदाहरणार्थ तुमच्‍या जमिनीचा तुमच्‍या इच्‍छेविरूध्‍द काही फेरफार करण्‍यात आल्‍यास, किंवा काही व्‍यवहार करण्‍यात आल्‍यास ते तुम्‍हाला आजच्‍या तारखेची 7/12 काढून पाहील्‍यावर लक्षात येईल. जमिनीच्‍या संदर्भात कोणत्‍याही प्रकारचा फेरफार असल्‍यास तलाठी 15 दिवसांची ऑनलाईन नोटीस काढत असतात, मात्र सदरील नोटीस बद्दल तुम्‍हाला बऱ्याचदा माहितीच नसते, मात्र या काळात कोणीच आक्षेप नाही नोंदवल्‍यास फेरफार प्रक्रिया राबविण्‍यात येते. अनेकदा असे प्रकारही दिसून येतात की कुटुंबातील सदस्‍यांनी कुठलीही कल्‍पना न देता जमिन नावावर करून घेतली आहे. त्‍यामुळे सतर्क राहणे आवश्‍यक आहे.

तसेच तुम्‍ही बँकेत काही कर्ज घेतले असल्‍यास त्‍याची नोंद सुध्‍दा 7/12 वर येते, किंवा तुम्‍ही कर्ज भरले असेल आणि तसे पत्र तलाठी यांना दिलेले असेल तर काही दिवसात तुमच्‍या नावावरील बोजा कमी केला जातो, याचीही माहिती 7/12 वर दिसून येते. सांगायचा मुद्दा एवढाच की, दोन – तीन महिन्‍यात एकदा तरी आपली 7/12 काढून चेक करा.

शिवाय आजच्‍या घडीला आपल्‍या गाव शिवारात किंवा आपल्‍या गटात कोणी जमीन खरेदी किंवा विक्री केली आहे किंवा फेरफार केला आहे याची माहिती हवी असेल तर Google वर आपली चावडी सर्च करा, वेबसाईट उघडा आणि राज्‍य, जिल्‍हा, तालुका आणि गाव निवडल्‍यास तलाठी यांनी कोणत्‍या फेरफारची नोटीस काढली आहे हे लक्षात येईल.

सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…

बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नेहमी मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!