अजित पवार यांनी कोणत्‍या 3 मोठ्या घोषणा केल्‍या आहेत ? खाली पहा…

राज्‍यात पावसामुळे अनेक जिल्‍ह्यात पूर आला असून त्‍यामुळे शेतकऱ्यांसह, व्‍यापारी व सर्वसामान्‍य नागरिकांचेही मोठे नुकसान झाले आहे, पुराचे पाणी घरात शिरल्‍यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत, याच पार्श्‍वभुमीवर राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी 3 मोठ्या घोषणा केल्‍या आहेत.

उपमुख्‍यमंत्री अ‍जित पवार यांनी विधान परिषदेत राज्‍यातील पूर परिस्थिती लक्षात घेवून तीन मोठ्या घोषणा केल्‍या आहेत ज्‍यामध्‍ये पहिली घोषणा पूरग्रस्‍तांना तातडीची 10 हजार रूपयांची मदत करणार, दूसरी घोषणा दुकानाचे नुकसान झाल्‍यास 50 हजाराची मदत केली जाणार आणि तिसरी घोषणा पुरात मृत्‍यूमुखी पडलेल्‍या नागरिकांच्‍या नातेवाईकांना 4 लाखांची मदत दिली जाणार या घोषणांचा समावेश आहे.

शिवाय शेती पिकांच्‍या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्‍याचेही आदेश देण्‍यात आले आहेत, बाधित व्‍यक्‍तींना स्‍वस्‍त धान्‍य दुकानातून तातडीने पुरवठा करण्‍याचेही आदेश देण्‍यात आले आहे. गरज असेल त्‍यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्‍यात यावा, ज्‍या रस्‍त्‍यांची हानी झाली आहे त्‍या रस्‍त्‍यांची तातडीने दुरूस्‍ती करण्‍यात यावी, ज्‍या विद्याथ्‍र्यांचे शैक्षणिक साहित्‍य खराब झाले आहे त्‍यांना नवीन शैक्षणिक साहित्‍य उपलब्‍ध करून द्यावी इत्‍यादी आदेशही देण्‍यात आले आहेत.

पुरामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे परंतू तरीही सदरील निर्णयामुळे पूरामुळे नुकसान झालेल्‍या नागरिकांना काही अंशी का असेना दिलासा मिळणार आहे.

सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…

बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नेहमी मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!