पीएम किसानचा 2000 चा हप्‍ता या तारखेला येणार !

मोदी सरकारचे म्‍हणजेच केंद्र सरकार द्वारे पीएम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्‍या खात्‍यात 2000 रूपये येण्‍यासाठी शेतकऱ्यांना Ekyc आणि बँक खात्‍याला आधार लिंक करणे आवश्‍यक आहे. ही 2 कामे प्रामुख्‍याने करणे आवश्‍यक असून तरच शेतकऱ्यांना 2000 चा हप्‍ता मिळणार आहे.

E-kyc तुम्‍ही मोबाईलवर सुध्‍दा करू शकता किंवा जवळच्‍या CSC किंवा ई सेवा केंद्रावर जावून सुध्‍दा फक्‍त 5 मिनिटात ईकेवायसी करता येते. शिवाय बँक खाते आधारशी लिंक करण्‍यासाठी तुम्‍हाला बँकेत जावे लागेल, त्‍यांना बँक खाते आधारशी लिंक करण्‍यास विनंती करावी, दुसरा पर्याय म्‍हणजे तुम्‍ही पोस्‍टात नवीन खाते उघडूनही ते खाते आधारशी लिंक करू शकता.

शेतकऱ्यांना पीएम किसान योजने प्रमाणेच राज्‍य सरकारचे सुध्‍दा 2000 मिळणार असल्‍याचे राज्‍य सरकारने यापूर्वीच जाहीर केले आहे. सदरील पैसे सुध्‍दा या हप्‍त्‍या सोबतच मिळण्‍याची शक्‍यता आहे. पीएम किसान योजनेचे 2000 रूपये 28 जुलैला येणार असल्‍याचे याआधी माध्‍यमांमध्‍ये सांगण्‍यात येत होते परंतू आता हा हप्‍ता एक दिवस आधीच म्‍हणजेच 27 जुलैलाच येणार आहे. प्रधानमंत्री राजस्‍थान येथील एका शेतकरी कार्यक्रमातून हा हप्‍ता ट्रान्‍सफर करणार आहेत.

सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…

बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नेहमी मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!