सोशल मीडियाचा वापर आजकाल मोठ्या प्रमाणात वाढला आहे, मात्र Do not Forward Wrong Messages. म्हणजेच चुकीचे मॅसेज फॉरवर्ड केल्यास आता ते तुमच्यासाठी अडचणीचे ठरू शकते. सोशल मीडियाचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे, जसे त्याचे फायदे आहे तसेच त्याचा चुकीचा वापर केल्यास त्यामुळे नुकसानही होवू शकते.
आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन उपलब्ध झाले आहे, स्मार्टफोन म्हटले की, त्यामध्ये इंटरनेट आणि सोशल मीडियाचे अॅप असतातच, असंख्य लोक या अॅप च्या माध्यमातून मॅसेज, फोटो, व्हिडीओ इत्यादी शेअर करत असतात, फक्त एवढ्यावरच हे थांबत नाही तर अनेक जण कुठलीही शहानिशा न करता आलेला मॅसेज पुढे फॉरवर्ड करतात.
Do not Forward Wrong Messages
अनेकांना वाटतं की, आपल्याला दुसरीकडून आलेला मॅसेज हा बरोबरच असेल आणि तो शहानिशा न करता तो मॅसेज फॉरवर्ड करतो, मात्र आपल्याला आलेला प्रत्येक मॅसेज हा खराच असतो असे नाही, आजकाल सोशल मीडियावर चुकीचे आणि खोटे मॅसेजही येतात, समाजामध्ये तेढ निर्माण करणारे, बदनामी करणारे, द्वेष निर्माण करणारे, भांडण तंटे वाढवणारे मॅसेज पण असतात, मात्र ते मॅसेज जे लोक पहिल्यांदा शेअर करतात ते जेवढे दोषी असतात तेवढेच त्याला फॉरवर्ड करणारेही दोषी असतात.