चुकीचे मॅसेज फॉरवर्ड करणाराही दोषीच ! – हायकोर्ट

हायकोर्टाने एका प्रकरणात महत्‍वाचा निर्णय दिला आहे. या निर्णया मध्‍ये कोर्टाने म्‍हटले आहे की, मॅसेज फॉरवर्ड करण्‍याचा अर्थ त्‍यातील मजकूराला मान्‍यता देणे असा आहे. जर त्‍यात अपमानास्‍पद, चुकीचा मजकूर असेल तर फॉरवर्ड करणाऱ्यालाही त्‍याचे परिणाम भोगावे लागतील.

एका नेत्‍याने पत्रकारा विरूध्‍द अपमानास्‍पद आणि असभ्‍य टिप्‍पणी फॉरवर्ड केली होती, यानंतर त्‍या व्‍यक्‍तीविरूध्‍द गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता, त्‍या व्‍यक्‍तीचा दावा होता की त्‍याने आलेला मॅसेज न वाचता केवळ फॉरवर्ड केला होता, नंतर त्‍याने त्‍याच दिवशी अपमानास्‍पद पोस्‍ट काढून टाकली आणि माफीही मागितली होती. मात्र सदरील म्‍हणणे हायकोर्टाने फेटाळून लावले.

हायकोर्टाने म्‍हटले की, यामुळे तुम्‍ही केलेला गुन्‍हा कमी होत नाही, प्रत्‍येकाने सामाजिक जबाबदारीचे पालन केले पाहीजे. सोशल मीडियावर संदेशाच्‍या माध्‍यातून जी देवाणघेवाण होते त्‍याचा अल्‍पावधीतच मोठा प्रभाव पडतो, त्‍यामुळे प्रत्‍येकाने संदेश तयार करतांना किंवा फॉरवर्ड करतांना सामाजिक जबाबदारीचे पालन केले पाहीजे. पाठवलेला किंवा फॉरवर्ड केलेला मॅसेज हा कायमचा पुरावा बनतो, यामुळे होणारी हानी भरून काढणे जवळजवळ अशक्‍य होते.

कंपन्‍याचाही पुढाकार

सोशल मीडिया कंपन्‍यांनीही आता फॅक्‍ट चेकिंग टीम तयार करण्‍यास सुरूवात केली आहे, या टीम्‍सच्‍या माध्‍यमातून सोशल मीडयावर पसरवल्‍या जाणाऱ्या माहितीची सत्‍यता तपासणे आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कार्यवाही केली जाणार आहे.

पोलीस कार्यवाही करणार !

आता पोलीस प्रशासन चुकीचे, खोटे, द्वेष पसरवणारे, जातीय तेढ निर्माण करणारे, भडकावणारे, बदनामी करणारे इत्‍यादी मॅसेज, फोटो, व्हिडीओ शेअर किंवा फॉरवर्ड करणाऱ्यांवर कार्यवाही करणार आहे. फक्‍त गुन्‍हाच दाखल केला जाणार नाही तर वेळप्रसंगी त्‍या व्‍यक्‍तीला जेलची हवा सुध्‍दा खावी लागणार आहे. त्‍यामुळे कोणत्‍याही प्रकारचे मॅसेज फॉरवर्ड करतांना योग्‍य ती काळजी घेणे आवश्‍यक आहे.

सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…

बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नेहमी मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!