ED अधिकाऱ्याला किती पगार असतो ? ईडी चा अधिकारी होण्‍यासाठी शिक्षण किती लागते ?

ईडी च्‍या अधिकाऱ्यांना आर्थिक गुन्‍हे रोखण्‍यासाठी प्रयत्‍न करावे लागतात, संबंधित प्रकरणामध्‍ये कोणी दोषी आढळल्‍यास त्‍या व्‍यक्‍तीची संपत्‍ती जप्‍त करण्‍याचा सुध्‍दा ईडी ला अधिकार असतो, शिवाय इतरही अनेक अधिकार ईडीला असतात, त्‍यामुळे ईडी ही आजच्‍या घडीला चर्चेत असलेली संस्‍था आहे.

अंमलबजावणी संचालनालय म्‍हणजेच ईडी मध्‍ये सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी म्‍हणून भरती होण्‍यासाठी एएससी CGL परीक्षा द्यावी लागते, यासाठी उमेदवाराचे वय 21 ते 30 दरम्‍यान असावे लागते, उमेदवार हा कोणत्‍याही मान्‍यताप्राप्‍त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतलेला असणे आवश्‍यक आहे.

ईडी मध्‍ये भरती होण्‍यासाठी CID, इंडियन रिवेन्‍यू सर्विस, इंडियन पोलीस सर्विस, IAS अशा विविधसंस्‍थांमध्‍ये कार्यरत असलेल्‍या अधिकाऱ्यांनाही या संस्‍थेत जाता येते. आता आपल्‍याला प्रश्‍न पडला असेल की ईडी सहायक अंमलबजावणी अधिकाऱ्याला किती पगार असतो तर त्‍याचे उत्‍तर आहे 44900 ते 142000 एवढे आहे. अनुभवानुसार व जेष्‍ठतानुसार पदाची श्रेणी वाढते आणि पगारही वाढत जातो.

सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…

बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नेहमी मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!