नमस्कार, या आर्टीकल मध्ये आपण ED Officer Salary and Qualification यासह इतर बाबींविषयी माहिती घेणार आहोत. राज्यासह देशात अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ED हे नाव ऐकताच अनेकांना घाम फुटतो, ईडी चे नाव ऐकताच मोठमोठे उद्योगपती, नेता, अभिनेता यांच्यासह विविध क्षेत्रातील लोक धास्ती घेतात, ईडी हे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे.
ईडी ची धाड पडली की आता या माणसाचा कार्यक्रम होणार अशी प्रतिक्रिया लोकांमध्ये असते. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ED ही आर्थिक कायद्याची अंमलबजावणी करणारी एक एजन्सी अथवा संस्था आहे. ही संस्था भारत सरकारच्या अर्थ मंत्रालया अंतर्गत येते.
ED Officer Salary and Qualification
भारतात आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ही संस्था काम करते. देशातील हवाला, मनी लॉन्ड्रींग, भ्रष्टाचार अशा आर्थिक गुन्ह्यांवर ईडी नजर ठेवते आणि कार्यवाही करते. ईडीचे मुख्यालय हे दिल्ली येथे असून मुंबई, चेन्नई, चंदीगढ आणि कोलकाता येथे विभागीय कार्यालय आहेत. ईडी विशेषत: विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम 1999 आणि संपत्ती निवारण अधिनियम 2002 या दोन कायद्यांचे पालन करते.
ईडी मध्ये थेट भरती शिवाय सीमा शुल्क, केंद्रीय उत्पादन शुल्क, पोलीस आणि प्राप्तीकर विभाग अशा विविध विभागातूनही प्रतिनियुक्तीच्या आधारावर घेतले जाते. ईडी मध्ये अधिकारी होण्यासाठी शिक्षण किती लागते आणि पगार किती असतो याबाबतच्या माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा….