टोमॅटोमुळे शेतकरी कसा बनला करोडपती ! एकाच दिवसात कशी झाली 8 लाखांची कमाई !

सध्‍या टोमॅटो घ्‍यावे किंवा नाही असा प्रश्‍न अनेकांना पडलेला असतांनाच दुसरीकडे मात्र टोमॅटोमुळे अनेक टोमॅटो उत्‍पादक शेतकऱ्यांना अच्‍छे दिन आले आहेत. कारण याच टोमॅटोमुळे शेतकऱ्याला एक प्रकारे लॉटरी लागली असून तो करोडपती झाला आहे.

पुणे जिल्‍ह्यातील जुन्‍नर तालुक्‍यातील तुकाराम गायकर यांना 18 एकर बागायती शेती आहे, यापैकी 12 एकरवर तुकाराम गायकर यांनी मुलगा ईश्‍वर आणि सून सोनालीच्‍या मदतीने टोमॅटोची लागवड केली होती, यामुळे 100 महिलांना रोजगारही मिळाला आहे.

मागील काही दिवसांपासून टोमॅटोला चांगला भाव मिळत आहे. महिनाभरात 12 एकरातून तब्‍बल 13 हजार कॅरेट टोमॅटो बाजारपेठेत विक्री करण्‍यात आले, यातून त्‍यांना सव्‍वा कोटीहून अधिक रूपयांची कमाई झाली आहे. नारायणगाव मार्केट मध्‍ये टोमॅटोला 2100 रूपयांचा भाव मिळाला. 11 जुलै रोजी गायकर कुटुंबाने 900 कॅरेटची विक्री केली त्‍यातून त्‍यांना तब्‍बल 18 लाख रूपये एकाच दिवसात मिळाले आहेत.

टोमॅटोसाठी 3 महिने केलेल्‍या कष्‍टाचे चीज झाले असल्‍याचे गायक कुटुंबाने सांगितले आहे. टोमॅटोला मिळत असलेल्‍या दरामुळे फक्‍त गायकर कुटुंबच नव्‍हे तर जिल्‍ह्यातील असंख्‍य शेतकरी लक्षाधिश आणि अनेक शेतकरी कोट्याधीश झाले आहेत. अनेकांच्‍या मते नारायणगाव मार्केट मध्‍ये पहिल्‍यांदाच टोमॅटोला एवढा भाव मिळाला आहे.

सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…

बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नेहमी मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!