Salman Khan Marriage : बॉलीवूडचा दबंग हिरो, भाईजान नावानेही परिचित असलेला आणि असंख्य सुपरहिट चित्रपट देणारा सुप्रसिध्द अभिनेता अर्थात सलमान खान नेहमी एका गोष्टीसाठी चर्चेत असतो, तो म्हणजे त्याचे लग्न कधी होणार ? भाईजान लग्नबंधनात कधी अडकणार ? सल्लू बाबा बोहल्यावर कधी चढणार ? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडलेले असतात.
काही दिवसांपूर्वी एका न्यूज चॅनलवर अँकरने सलमानला विचारले की, तू लग्न कधी करणार आहेस ? त्यावर सलमान म्हणाला देवाच्या मनात येईल तेव्हा माझं लग्न होईल, आधी लग्नसाठी मी हो म्हणायचो तेव्हा समोरची व्यक्ती नाही म्हणायची. नंतर समोरची व्यक्ती हो म्हणू लागली पण मी नकार देऊ लागलो.
Salman Khan Marriage
आता परिस्थिती अशी आहे की, दोन्ही बाजूने हे होत नाही, जेव्हा दोन्ही बाजूने होकार होईल तेव्हा मी लग्न करेल. अर्थात मी ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडेल त्या व्यक्तीसोबत मी संसार थाटणार आहे. सलमानला पुन्हा प्रश्न विचारण्यात आला की, तुझा काही प्लान असेल तर सांग. तेव्हा सलमान म्हणाला माझ्यावर आता खूप दबाव येत आहे.
सलमानच्या म्हणण्यानुसार त्याचे पालक देखील त्याला लग्न करण्याबाबत दबाव टाकत आहे, त्यामुळे थोडंसं दडपण आलं आहे. सलमानचे आजपर्यंत अनेक अभिनेत्रीसोबत नाव जोडले गेले आहे, लग्न पत्रिका छापण्यापर्यंत विषय झाला होता, परंतू पुढे काही होवू शकले नाही.
सलमानचं लग्न कधी होणार ?
भाईजान अर्थात सलमानच्या लग्नाबाबत नेहमी चर्चा होत असतात, मागील काळात त्याचे नाव अनेक अभिनेत्रीसोबत जोडले गेले होते, मिडीयामध्ये हा विषय एवढा चर्चेला आला होता की सगळीकडे याच विषयाची चर्चा होती, मात्र आतापर्यंत सलमानने लग्न केलेले नाही.
सलमानने अनेक चित्रपट केले आहेत ज्यामध्ये त्याचे नाव प्रेम आहे. अर्थात रोमँटीक चित्रपटात त्याचे नाव प्रेम असते. असे अनेक रोमँटीक चित्रपटात सलमानने काम केले आहे. सदरील चित्रपट खूप सुपरहिट ठरले असून या चित्रपटांनी कोट्यावधींची कमाईही केली आहे.
Salman Khan Wedding
सलमानच्या लग्नाबाबत वारंवार चर्चा होत असतात, आता त्याचे लग्न होणार म्हणून बातमी समोर आली आहे, परंतू थोडं थांबा, हे लग्न प्रत्यक्षात न होता चित्रपटात होणार आहे. कारण लवकरच “प्रेम की शादी” हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटाच्या प्री प्रोडक्शनवर काम सुरू झाले असून येत्या काही काळात त्याचे शुटींगही पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
म्हणजेच यावेळीही सलमानच्या चाहत्यांना त्याला चित्रपटात लग्न होतांना पहावे लागणार आहे, त्याच्या खऱ्या लग्नसाठी त्याच्या चाहत्यांना अजून काही काळ प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे दिसत आहे. असं म्हटलं जातं की, सलमानचं लग्न होईलच, परंतू तरीही आपण सलमानचे चाहते असाल आणि आता पर्यंत आपले लग्न झाले नसेल तर उरकून घ्या… धन्यवाद…
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.