Unorganized workers Scheme : देशातील असंगठीत कामगार हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. शेती, उद्योग, बांधकाम यासह अनेक क्षेत्रात असंगठीत कामगार काम करत असतात, या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व लोकांचे देश उभारणीत मोठे योगदान आहे. मात्र हा घटक वर्षानुवर्षे दुर्लक्षित आहे. त्यांना आर्थिकदृष्टया मदत करणे आवश्यक आहे.
राज्यामध्ये आजघडीला विविध क्षेत्रात काम करणारे कोट्यावधी असंघटीत कामगार आहेत, बऱ्याचदा आपल्याला वाटते की, फक्त बांधकाम कामगारच असंगठीत कॅटेगरी मध्ये येतात, तर तसे नाही, विविध क्षेत्रात काम करणारे मग ते कोणत्याही उद्योग किंवा व्यवसायाशी निगडीत असो, ते या कॅटेगरी मध्ये येतात.
Unorganized workers Scheme
यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला असंघटीत कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार ई-श्रम पोर्टल तयार केले होते, ज्यामध्ये मे महिन्यापर्यंत 136.28 लाख असंगठीत कामगारांनी नोंदणी केलेली आहे. सदरील कामगार हे विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. आता महाराष्ट्र सरकारने यापुढे जावून जवळपास सर्वच क्षेत्रातील कामगारांसाठी महामंडळ स्थापन केले आहे.
महामंडळाचा कोणाला लाभ मिळणार ?
महाराष्ट्र सरकारने असंगठीत कामगारांना दिलासा देण्याच्या दृष्टीने “महाराष्ट्र राज्य असंघटीत कामगार कल्याण महामंडळ” स्थापन केले असून या अंतर्गत 39 Virtual मंडळे स्थापन करण्याचाही निर्णय घेतला आहे. शिवाय यामध्ये 340 प्रकारच्या कामगारांना लाभ देण्यात येणार आहेत.
सरकारने जाहीर केलेल्या यादीनुसार 340 विविध क्षेत्रातील नागरिकांना या महामंडळाचा लाभ मिळणार आहे. ज्यामध्ये
- शेतमजूर
- बांधकाम कामगार
- पत्रकार
- फ्री लान्सर
- दूध डेरी वर्कर
- ड्रायव्हर (सर्व)
- रिक्षा ड्रायव्हर / चालक
- जेवण बनवणारे
- बिडी कामगार
- कपडा कामगार
- सफाई कामगार
- बँक एजन्ट
- सलून कामगार
- कॅमेरामन
- शिक्षा मित्र
- केबल टीवी ऑपरेटर
- वेल्डर
- फुड प्रोसेसिंग कामगार
- डाटा एन्ट्री ऑपरेटर
- उद्योगातील लाईनमन
- दुरूस्ती करणारे
- विविध वस्तू बनवणारे
असे जवळपास सर्वच क्षेत्रातील 340 उद्योग, व्यवसायात काम करणारे व्यक्ती या महामंडळा अंतर्गत येतात. महामंडळा अंतर्गत असलेल्या विविध योजनांचा लाभ या कामगारांना मिळणार आहे. कामगारांच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण निर्णय असून विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. नवीन कामगार महामंडळात अजून कोणाला लाभ होणार आह यासाठी खालील GR आपण वाचू शकता.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.