Your Alt Text

प्रधानमंत्री ग्राम परिवहन योजना | आता खरेदी करा स्‍वत:चे प्रवासी वाहन ! सरकार देणार पैसे ! | Pradhan Mantri Gram Parivahan Yojana

ग्रामीण भागातील युवकांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण सरकार आता Pradhan Mantri Gram Parivahan Yojana अंतर्गत त्‍यांच्‍यासाठी प्रवासी वाहन खरेदीसाठी पैसे (अनुदान) देणार आहे. अनेक युवकांना ग्रामीण भागात पैशांअभावी स्‍वत:चे वाहन खरेदी करता येत नाही, परंतू आता त्‍यांना स्‍वत:चे वाहन खरेदी करणे शक्‍य होणार आहे.

आपल्‍याला माहितच आहे की, आजही देशातील अनेक भागात अथवा ग्रामीण भागात प्रवासी वाहनांची संख्‍या कमी आहे, म्‍हणजेच ग्रामीण भागात एका गावातून दुसऱ्या गावात जाण्‍यासाठी किंवा जवळच्‍या बाजारपेठेत जाण्‍यासाठी प्रवासी वाहने कमी आहेत, काही भाग असे आहेत की तेथे अजूनही कोणत्‍याच प्रकारचे प्रवासी वाहन नाहीत.

Pradhan Mantri Gram Parivahan Yojana

मागील काळात प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत अनेक गावांना जोडणारे रस्‍ते तयार झाले आहेत मात्र आजही असंख्‍य गावांमध्‍ये येण्‍या जाण्‍यासाठी वाहने नाहीत, त्‍यामुळे अनेकांना एका गावातून दुसऱ्या गावाला जाण्‍यासाठी त्रास सहन करावा लागतो, त्‍यामुळे केंद्र प्रधानमंत्री ग्राम परिवहन योजनेच्‍या माध्‍यमातून युवकांना खाजगी प्रवासी वाहन घेता येणार आहे. काय आहे योजना आणि किती मिळणार अनुदान आता ते पाहुया…

प्रवासी वाहन खरेदीसाठी किती पैसे मिळणार ?

प्रधानमंत्री ग्राम परिवहन योजनेच्‍या माध्‍यमातून युवकांना खाजगी प्रवासी वाहन घेण्‍यासाठी अनुदान देण्‍यात येणार आहे. ज्‍या गावांमध्‍ये परिवहनची सुविधा नाही, किंवा कमी आहे अशा गावांमध्‍ये प्रवासी वाहन घेण्‍यासाठी या योजनेच्‍या माध्‍यमातून अनुदान देण्‍यात येणार आहे.

प्राप्‍त माहितीनुसार या योजनेच्‍या माध्‍यमातून 30 टक्‍के पर्यंत किंवा दिड लाखांपर्यंत अनुदान देण्‍यात येणार आहे, अशाच प्रकारची मुख्‍यमंत्री ग्राम परिवहन योजना बिहार व इतर राज्‍यात सुरू झाली असून आता इतर राज्‍यातही सुरू होणार आहे. देशपातळीवर या योजनेच्‍या माध्‍यमातून युवकांना खाजगी प्रवासी वाहन घेण्‍यासाठी अनुदान देण्‍यात येणार असल्‍याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्‍या माहितीनुसार केंद्र सरकार ही योजना देशभरात लागू करण्‍याचा प्रयत्‍न करीत आहे, अर्थात योजनेचे काम प्राथमिक टप्‍पयात असल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. राज्‍याप्रमाणे अनुदान कमी अधिक असून शकते, किंवा योजनेत काही अंशी बदल सुध्‍दा केला जावू शकतो, राज्‍यात ही योजना कधी पर्यंत सुरू होईल याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही, मात्र बेरोजगारी कमी करण्‍याच्‍या दृष्‍टीने लवकरच ही योजना सुरू होईल असे सांगण्‍यात येत आहे.

सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…

बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नेहमी मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

Leave a Comment

error: Content is protected !!