आपल्याकडे 2 पर्याय आहेत, एकतर आपण CSC केंद्रावर जावून सुध्दा ऑनलाईन नाव अॅड करू शकता, किंवा पुरवठा विभागाच्या वेबसाईटवरून सुध्दा अॅड करता येईल. त्यासाठी आपणास पुरवठा विभागाच्या वेबसाईटवरून फॉर्म क्रमांक 3 डाउनलोड करावा लागेल.
त्यानंतर फॉर्मची प्रिंट काढून त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल, शिवाय ज्या व्यक्तीचे नाव अॅड करायचे आहे त्याचे नाव टाकणे व कुटुंब प्रमुखाची माहिती भरावी. भरलेल्या फॉर्मवर अंगठ्याचा ठसा किंवा सही करा. फॉर्म भरल्यानंतर CSC केंद्रावर किंवा पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर फॉर्म अपलोड करा. त्यानंतर दिलेली माहिती विभागाकडून पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर नाव समाविष्ट केले जाईल.
आपण नवीन नाव ऑफलाईन सुध्दा अॅड करू शकता, यासाठी सर्वप्रथम रेशन दुकान किंवा पुरवठा विभागाकडून फॉर्म क्रमांक 3 घ्यावा, तो भरून मागितलेली सर्व कागदपत्रे जोडावीत आणि तो फॉर्म कार्यालयात जमा करावा, फॉर्म जमा झाल्यानंतर त्याची पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर नवीन नाव जोडले जाईल.
सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…
मित्रांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नियमित / दररोज मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.