तुम्‍ही विकत घेतलेला सेकंड हॅण्‍ड मोबाईल चोरीचा तर नाही ना ? चेक करा फक्‍त 2 मिनिटात !

आपण विकत घेतलेला मोबाईल चोरीचा तर नाही ना ? हे चेक करण्‍यासाठी आपल्‍याला कुठेही जाण्‍याची आवश्‍यकता नाही, आपण आपल्‍या मोबाईलवर फक्‍त 2 मिनिटात हे चेक करू शकता. त्‍यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा…

  • सर्वप्रथम जो मोबाईल विकत घेतला आहे किंवा घ्‍यायचा आहे त्‍या मोबाईलचा IMEI नंबर जाणून घेण्‍यासाठी मोबाईल मध्‍ये *#06# डायल करा.
  • डायल केल्‍यावर स्‍क्रीनवर जो IMEI नंबर दिसेल तो कुठे तरी लिहून ठेवा.
  • यानंतर सरकारच्‍या वेबसाईटला भेट द्या. त्‍यासाठी https://www.ceir.gov.in/Device/CeirIMEIVerification.jsp या वेबसाईटला भेट द्या.
  • येथे तुमचा मोबाईल नंबर टाका, त्‍यानंतर आपणास जो OTP येईल तो येथे टाका.
  • यानंतर आपणास IMEI नंबर टाकायचा ऑप्‍शन दिसेल.
  • आपण IMEI नंबर टाकताच तुम्‍हाला स्‍टेटस दिसेल.
  • म्‍हणजेच येथे तुम्‍हाला मोबाईलबद्दल सर्व माहिती दिसेल.

जर मोबाईल बद्दल काहीही अडचण दाखवत नसेल तर आपणास मोबाईल वापरण्‍यास काहीही हरकत नाही. धन्‍यवाद….

सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…

मित्रांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नियमित / दररोज मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!