महाराष्ट्र शासनाने आता एक जीआर काढला असून या नुसार वारकऱ्यांसाठी आता विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून विमा छत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
दिंडीच्या दरम्यान झालेल्या दुर्घटनेत / अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास प्रत्येकी 5 लाख रूपये शासनाकडून वारसास सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. किंवा अपंगत्व आल्यास विमा योजनेच्या माध्यमातून 1 लाख रूपये देण्यात येणार आहे. तसेच एक हात / पाय / डोळा निकामी झाल्यास 50 हजार रूपये देण्यात येणार आहे. तसेच वैद्यकीय उपचारासाठी 35 हजारा पर्यंत रक्कम विमा कंपनीद्वारे मिळणार आहे.
विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजनेची अंमलबजावणी, संनियंत्रण व इतर कार्यवाही शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून करण्यात येणार आहे.
सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…
मित्रांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नियमित मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.