राज्यातील शेतकरी बांधव पाऊस कधी येणार म्हणून वाट पाहात आहेत. पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. 8 जुनला येणारा पाऊस चक्रीवादळामुळे लांबला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पहायला मिळत आहे. परंतू प्रसिध्द हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारा अंदाज वर्तवला आहे.
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 23 जून पासून पावसाला सुरूवात होणार आहे. 24 जून ते 2 जुलै पर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुध्दा होणार आहे. या कालावधी मध्ये चांगला पाऊस होणार असल्यामुळे पेरण्या सुध्दा होतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
हवामान विभागानेही 23 जून पासून पावसाला सुरूवात होणार असल्याचे सांगितले आहे. पंजाबराव डख आणि हवामान विभाग दोघांनीही पावसाबाबत दिलासादायक अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या 23 जूनपासून राज्यभरात पाऊस पडेल असे दिसत आहे. मात्र चांगला पाऊस होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या करू नये असे आवाहन कृषि क्षेत्राशी संबंधित तज्ञांनी केले आहे.
सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…
मित्रांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नियमित मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.