केंद्र सरकारने जो निर्णय घेतला आहे आणि राज्य सरकारनेही ज्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे तो निर्णय म्हणजे स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत बँका, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, खाजगी बँका यांच्या सेवा राज्यातील सर्व शिधावाटप / रास्त भाव दुकाना मधून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
शासनाच्या निर्णयामुळे बँकांकडून रास्त भाव दुकानदारांना त्यांनी ग्राहकांना प्रदान केलेल्या विविध उत्पादनांसाठी / सेवांसाठी वाढीव महसूल प्राप्त होईल. बँकांमार्फत विविध वित्तीय संस्थांच्या सहयोगाने ग्राहकास कर्ज सुविधा उपलब्ध होतील. रास्त भाव दुकानांमधून विविध उत्पादन / सेवा पुरविल्यामुळे पुरवठा वाढेल तसेच क्रॉस सेलींगची शक्यताही वाढेल.
रास्त भाव दुकानदारांना बँकासोबत काम करण्याची आणि बँकांचे उत्पादने व सेवा वितरीत करण्याची संधी मिळेल. तसेच विक्री व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी देखील उपलब्ध होवू शकते. याबाबतचा निर्णय शासनाने घेतला असून यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांचे उत्पन्न वाढणार असून नागरिकांनाही स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून बँकिंग सेवा उपलब्ध होणार आहे.
सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…
मित्रांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नियमित मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.