शासनाने सन 2022 च्या पावसाळी हंगामातील अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून सर्व विभागीय आयुक्तांकडून प्राप्त झालेल्या निधी मागणीच्या प्रस्तावा मधील बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने व निकषानुसार एकूण 1500 (दिड हजार) कोटी रूपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्याला मदत मिळणार ?
शासनाने जाहीर केलेला निधी अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, बुलढाणा, जळगाव, जालना, नागपूर, नाशिक, धाराशिव (उस्मानाबाद), परभणी, सोलापूर, वाशिम या जिल्ह्यांना मदत मिळणार आहे.
शासनाने जाहीर केलेल्या 1500 कोटी मदत निधी मुळे संबंधित जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…
मित्रांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नियमित मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.