शेतकरी बांधवांनो, यापूर्वी आपणास पीएम किसान योजनेची नवीन नोंदणी करण्यास अडचण येत होती, म्हणजे आपल्या तालुक्यात योग्य अशी यंत्रणा कार्यान्वीत नव्हती, परंतू आता शासनाने विविध विभागांना जबाबदारी वाटून दिली आहे, म्हणजेच आता नवीन नोंदणी प्रक्रिया जलद होणार आहे.
नवीन नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे लागणार ?
- आधारकार्ड
- बँक पासबुक
- 7/12
- 8-अ उतारा
- रेशनकार्ड
- फेरफार
- मोबाईल नंबर इ.
नोंदणी कशी करायची ?
शेतकरी बांधवांना https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. सदरील नोंदणी ही स्वत: किंवा तालुका कृषि अधिकारी किंवा CSC, महा-ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून करता येईल. शेतकऱ्यांना ekyc करणे आवश्यक आहे. तसेच आधारकार्डला बँक खात्याशी लिंक करणेही आवश्यक आहे.
नोंदणी केल्यावर तहसिलदार व तालुका कृषि अधिकारी यांचे मार्फत पडताळणी पूर्ण करून जिल्हा कृषि अधिकारी यांच्या मार्फत पडताळणी केली जाईल व नंतर कृषि आयुक्त यांच्या स्तरावर मान्यता देण्यात येईल. त्यानंतर आपणास या योजनेचा लाभ मिळेल.
सध्या पीएम किसान योजनेचे वर्षाला 2000 चे 3 हप्ते मिळतात म्हणजेच वर्षाला 6 हजार मिळतात, आता राज्य सरकारचेही वर्षाला 2000 चे 3 हप्ते म्हणजेच वर्षाला 6000 मिळणार आहेत. म्हणजेच केंद्र सरकारचे 6000 व राज्य सरकारचे 6000 असे एकूण वर्षाला 12 हजार रूपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…
मित्रांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नियमित मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.