राज्यातील तरूण तरूणींसाठी महाराष्ट्र सरकारने Mukhyamantri Vyavsay Karj Yojana सुरू केली आहे. सदरील योजनेला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या नावाने सुध्दा ओळखले जाते. या आर्टीकल मध्ये आपणास मुख्यमंत्री व्यवसाय कर्ज योजना काय आहे ? या योजनेचा लाभ कोणाला घेता येईल ? यासह योजने बद्दलची इतर माहिती आपणास या आर्टीकल मध्ये मिळेल.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील युवक युवतींसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) सुरू केला आहे. राज्यात अनेक युवक असे आहेत जे बेरोजगार आहेत, ज्यांच्या हाताला काम नाही, सुशिक्षित असूनही नोकरी नाही, शिवाय व्यवसाय करावा तर भांडवल नाही, त्यामुळे अनेक युवक भांडवला अभावी आपला व्यवसाय सुध्दा सुरू करू शकत नाही.
मुख्यमंत्री व्यवसाय कर्ज योजनेचा लाभ कसा मिळेल ? येथे क्लिक करा…
असंख्य युवकांमध्ये नवीन काही तरी करण्याची जिद्द असते, नवनवीन आयडीया असतात, ज्यांची योग्य प्रकारे अंमलबजावणी केल्यास त्यांना मोठे यश मिळू शकते, अर्थात छोट्या व्यवसायातूनच अनेक मोठे उद्योजक घडत असतात, मात्र हे सर्व करण्यासाठी पैसा लागतो, मात्र हाच पैसा अथवा भांडवल नसल्यामुळे युवकांमध्ये निराशा येते. मात्र शासनाने आता युवक युवतींना उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी सदरील योजना सुरू केली आहे. या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा….