गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने Kusum Solar Pump Yojana Maharashtra म्हणजेच कुसुम सोलर पंप योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर सोलर पंप देण्यात येत आहे. त्यानुसार शेतकरी बांधवांकडून अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे.
मागील काळात सदरील कुसुम सोलर पंप योजना ची वेबसाईट मध्ये तांत्रिक अडचण येत होती, त्यामुळे ऑनलाईन अर्ज करण्यात अडथळा येत होता, शिवाय सुरूवातीच्या काळात कोटा संपल्याचा मॅसेज सुध्दा दाखवत होता, परंतू आता शासनाने सदरील कोटा वाढवल्याचे दिसून येत आहे. कारण आता बहुसंख्य शेतकरी ऑनलाईन अर्ज करत आहेत.
सोलरचा फॉर्म भरतांना काय काळजी घ्यावी ?
शेतकऱ्यांना नेहमी विजेची समस्या सतावत असते, शक्यतो दिवसा वीज नसते, अशा परिस्थितीत त्यांना सौर कृषि पंप असल्यास दिवसाही पिकांना पाणी देणे शक्य होणार आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्ज करीत आहेत. मात्र घाईगरबडीत फॉर्म चुकीच्य पध्दतीने भरला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे, शिवाय अर्ज भरतांना कोणते कागदपत्र लागणार आहेत तेही माहित असणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील लिंकला क्लिक करा….