Svanidhi se Samriddhi Yojana : देशभरात कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाउनमुळे राज्यातील असंख्य नागरिकांवर मोठा परिणाम झाला आहे. अर्थात त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे शासनाने त्यांना व्यवसाय परत सुरू करण्यासाठी खेळते भांडवल मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने यापूर्वीच एका योजनेची घोषणा केली होती. मात्र आता त्या योजनेला मर्यादित न ठेवता व्यापक दृष्टीने काम करण्यात येणार आहे.
संबंधित नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक अशा सर्वसमावेशक प्रगतीवर भर देण्याच्या सूचना प्रधानमंत्री यांनी दिल्या आहेत. त्या दृष्टीने संबंधित कुटुंबाचे सर्वेक्षण करून त्यांना शासनाच्या इतर योजनांचा फायदा मिळवून देण्याचे केंद्र सरकारने स्वनिधी से समृध्दी या अंतर्गत योजले आहे. त्यादृष्टीने शासनाने पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे.
आता 8 योजनंचा लाभ कोणाला मिळणार ? येथे क्लिक करा…
केंद्र शासनाच्या सदरील योजने अंतर्गत कार्यक्रम राज्यात राबविणेसाठी योजने अंतर्गत लाभार्थी व त्यांचे कुटुंब यांचे समावेश करण्याबाबत शासन निर्णय घेत आहे. त्यासाठी काही मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात येत आहे. सदरील योजना राज्यात राबविण्यात येणार असल्यामुळे राज्यातील असंख्य नागरिकांना याचा लाभ होणार आहे. योजने अंतर्गत 8 योजनंचा कोणाला लाभ होणार याबद्दलच्या माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा…