सुरू करा स्‍वत:चा यूट्यूब चॅनल आणि करा लाखोंची कमाई ! काय आवश्‍यक आहे ?

मित्रांनो, यूट्यूब चॅनल सुरू करण्‍यासाठी खूप काही असण्‍याची आवश्‍यकता नाही, आपल्‍याकडे मोबाईल (स्‍मार्टफोन म्‍हणजेच स्‍क्रीनटच) तर आहेच, याच मोबाईलवरून आपण यूट्यूब चॅनल सुरू करू शकता. यासाठी आपल्‍याला कोणताही खर्च विशेष खर्च करण्‍याची आवश्‍यकता नाही.

यूट्यूब चॅनल सुरू करण्‍यासाठी फक्‍त आवश्‍यकता असते एका इमेल (Email) आयडी ची. तो सुध्‍दा आपल्‍या मोबाईल मध्‍ये शक्‍यतो असतोच, कारण ज्‍यावेळेस आपण मोबाईल घेता त्‍यावेळेस त्‍यात इमेल टाकल्‍याशिवाय प्‍ले स्‍टोर किंवा Youtube सुरूच होत नाही. त्‍यामुळे तोच इमेल आपण आपल्‍या चॅनलसाठी वापरू शकता.

यूट्यूब चॅनल कसे सुरू करावे यासाठी आपल्‍याला Youtube वरच असंख्‍य व्हिडीओ पहायला मिळतील. यूट्यूब वर गेल्‍यास “यूट्यूब चॅनल कसे सुरू करायचे ?” असे लिहा किंवा बोला. किंवा यूट्यूब चॅनल कैसे शुरू करे ? असे हिंदीतही लिहू शकता किंवा बोलू शकता. आपल्‍या समोर असंख्‍य व्हिडीओ दिसतील. त्‍या प्रमाणे आपण अवघ्‍या 5 मिनिटात चॅनल सुरू करू शकता.

चॅनल बनवल्‍यानंतर आपणास आपल्‍या आवडीनुसार स्‍वत:च्‍याच मोबाईलने स्‍वत:च्‍या आवाजासह व्हिडीओ रेकॉर्डिंग करून व्हिडीओ चॅनलवर अपलोड करू शकता, कसे करायचे याचेही असंख्‍य व्हिडीओ यूट्यूबवर आहेत. जसे जसे आपण व्हिडीओ बनवत राहाल तसे तसे आपल्‍या मध्‍ये Confidence वाढत जाईल आणि आपले व्हिडीओ अधिक चांगले बनत राहतील.

मित्रांनो, आता आपला प्रश्‍न असेल की पैसे कसे कमवायचे ? तर यासाठी वेगळे काही करण्‍याची आवश्‍यकता नसते, जेव्‍हा आपले व्हिडीओ लोक पाहू लागतात, तेव्‍हा आपले Subcsriber होत जातात, म्‍हणजेच आपल्‍याला फॉलो करणारे लोक आपल्‍याशी जुडत जातात, आणि त्‍यानंतर Youtube आपल्‍या व्हिडीओवर जाहिराती दाखवणे सुरू करते आणि याच जाहीराती मधून आपणास पैसे मिळत राहतात.

या दरम्‍यान आपल्‍याला आपले बँक खाते आपल्‍या चॅनलला लिंक करण्‍याची सुविधा दिली जाते, जेव्‍हा अकाउंट मध्‍ये 100 डॉलर च्‍या वर पैसे होतात, तेव्‍हा ते आपल्‍या अकाउंट मध्‍ये ट्रान्‍सफर केले जातात. मित्रांनो, अनेकांना यूट्यूब चॅनल बनवणे अवघड वाटत असते परंतू असे काही नाही, आपण थोडा वेळ देवून चॅनलही बनवू शकता आणि काही कालावधीनंतर यातून चांगले पैसेही कमवू शकता.

दूसरी एक गोष्‍ट म्‍हणजे व्हिडीओ रेकॉर्ड करण्‍यासाठी माईक नसला तरी चालतो, मात्र आवाज चांगला येण्‍यासाठी आपण बाजारातून किंवा ऑनलाईन Boya By m1 हा माईक मागवू शकता, ज्‍याला बहुतांश चॅनलवाले वापरतात. यामुळे आपला आवाज स्‍पष्‍ट रेकॉर्ड होईल. याची किंमत अंदाजे 800 ते 900 असेल. मात्र सुरूवातीला आपण माईक न घेताही प्रयत्‍न करू शकता. जेव्‍हा आपणास वाटेल आवाज अधिक चांगला यावा तेव्‍हा हा माईक घेता येईल.

राहीला प्रश्‍न विषय कोणता घ्‍यावा तर आपण कोणताही विषय घेवून व्हिडीओ बनवू शकता, आपण शेतीविषयक माहिती देवू शकता, मेकॅनिक वाहना बद्दल माहिती देवू शकतात, महिला किचन मधील तयार होणाऱ्या पदार्थांबबद्दल माहिती देवू शकतात, कोणाला राजकारणावर बोलण्‍याची इच्‍छा असेल तर ते बोलू शकतात, कोणी शिक्षणावर बोलू शकतो, किंवा आपणास इतर कशाचीही माहिती असेल किंवा आपण कोणत्‍याही विषयावर बोलू शकत असाल तर नक्‍कीच आपण त्‍याचा व्हिडीओ बनवू शकता.

मित्रांनो, ही माहिती आपणास आवडली असेल तर आपल्‍या मित्रांनाही शेअर करा, जेणेकरून आपल्‍या मित्रांपैकी जो इच्‍छुक आहे तो व्हिडीओ बनवू शकेल. अशाच प्रकारच्‍या माहितीसाठी आपण आमच्‍या व्‍हाट्सअॅप ग्रुपला जॉईन होवू शकता. आतापर्यंत आपण आमच्‍या कोणत्‍याही ग्रुपला जॉईन नसाल तर स्‍क्रीनवर दिसत असलेला व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून ग्रुप जॉईन करा…

सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…

error: Content is protected !!