एकरी 200 टन उत्‍पादन व ऊसासारखा भाव मिळणाऱ्या या पिकाची लागवड करा !

नितीन गडकरी हे कोणत्‍याही प्रकारचे आवाहन करतांना किंवा मत व्‍यक्‍त करतांना त्‍या गोष्‍टीचा अभ्‍यास करून किंवा योग्‍य ती माहिती घेवूनच बोलत असतात असा आतापर्यंत अनुभव आहे. आता त्‍यांनी ज्‍या पिकाबद्दल सांगितले आहे अर्थातच त्‍यांनी त्‍या पिकाची माहिती घेवूनच आणि सर्व बाजूने विचारमंथन करूनच शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.

शेतकऱ्यांना नितीन गडकरी यांनी ज्‍या पिकाबद्दल आवाहन केले आहे, त्‍या पिकाचे नाव बांबू आहे. होय आपणास आश्‍चर्य वाटेल पण हेच बांबू शेतकऱ्यांना वरदान ठरणार असल्‍याचे बोलले जात आहे. कारण एका एकरात 200 टन बाबू होतो, शिवाय त्‍याला भावही चांगला मिळतो. बांबू सर्वात जास्‍त कार्बनडाय ऑक्‍साईड सोसून घेतो, शिवाय वीज निर्मितीसाठी कोळशाऐवजी बांबूचा वापर करता येतो.

यामुळे स्‍वस्‍तात वीज निर्मिती होईल आणि देशाचे 16 लाख कोटी रूपये वाचून ते शेतकऱ्यांना मिळाले तर शेतकरी अन्‍नदाता व उर्जादाता बनेल असे त्‍यांनी सांगितले. तसेच सदरील बांबू देशाच्‍या विकासात योगदान देणार असून आता रस्‍त्‍यांच्‍या बाजूला बांबूच्‍या बॅरीकेडींग लावण्‍यात येणार असून सरकारही बांबूच्‍या लागवडीस प्रोत्‍साहन देत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…

मित्रांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नियमित मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!