आपण अनेकदा रेल्वे पाहत असतो, परंतू आपल्याला अनेकदा प्रश्न पडला असेल की, Diesel Engine Train Mileage per Litre किती असते ? म्हणजेच एका लिटरमध्ये रेल्वे (ट्रेन) किती किलोमिटर धावते ? कोणत्या रेल्वे ट्रेनला जास्त डिझेल लागतो ? कोणत्या ट्रेनला कमी डिझेल लागतो ? अशा महत्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे आपणास या आर्टीकल मध्ये मिळतील.
आपल्याला माहितच आहे की, देशभरात रेल्वेचे नेटवर्क मोठे आहे. देशाच्या चारही दिशेला रेल्वेचे नेटवर्क असल्यामुळे प्रवाशी रेल्वे सेवेचा वापर करत असतात, विशेष करून लांबच्या प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य दिले जाते, भारतात ज्या ट्रेन धावतात त्यामध्ये काही एक्सप्रेस असतात तर काही लोकल असतात शिवाय काही ट्रेन या मालवाहू सुध्दा असतात.
Diesel Engine Train Mileage per Litre
रेल्वेचा प्रवास कमी खर्चात आरामदायी होत असल्यामुळे अनेकांची रेल्वेला पसंती असते. आधीच्या काळात रेल्वे कोळशावर धावत होती, मात्र त्यानंतर रेल्वे इंधनावर धावू लागल्या. आता तर अनेक ट्रेन विजेवर सुध्दा धावू लागल्या आहेत. मात्र तरीही आजही असंख्य ट्रेन ह्या डिझेलवर धावतात, मात्र या ट्रेन एका लिटर मध्ये किती धावत असतील असा प्रश्न आपल्याला पडतो, याचे उत्तरे आपणास येथे मिळेल.